स्वित्झर्लंडमध्ये नव्याने बनले ऑलिम्पिक मुख्यालय


स्वित्झर्लंडच्या लुसाने येथे ऑलिम्पिक व पॅरालीम्पिक गेम्सचे नवे मुख्यालय तयार झाले आहे. नेदरलँड्सच्या थ्री एक्सएन कंपनीने याचे बांधकाम केले आहे. जुन्या जागी हे नवे मुख्यालय बांधले गेले आहे आणि स्विस आर्किटेक्ट इतेन ब्रेशबुल यांच्या म्हणण्यानुसार हे जगातील सर्वाधिक इकोफ्रेंडली इमारत आहे. कारण जुन्या इमारतीतील ९५ टक्के सामानाचा यात पुनर्वापर केला गेला आहे. या इमारतीसाठी १४.५ कोटी डॉलर्स म्हणजे १००० कोटी रुपये खर्च आला आहे.


येथे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे ५०० कर्मचारी काम करणार आहेत. उर्जा गरज भागविण्यासाठी अक्षय स्रोत वापर केला गेला असून त्यासाठी छतावर पूर्ण सोलर पॅनल बसविली गेली आहेत. त्यातून ६० घरांना पुरेल इतकी वीज निर्मिती होणार आहे. पाणी वाचविण्यासाठी इमारतीत पावसाचे पाणी एकत्र करण्याची सोय आहे. हे पाणी सिंचन आणि टॉयलेट साठी वापरले जाणार आहे.

थ्री एक्सएन चे वरिष्ठ भागीदार किम निल्सन म्हणाले, या इमारतीत एसी ची गरज कमी भासावी म्हणून इमारतीचे स्ट्रक्चर पुढच्या बाजूला कललेले आहे. त्यामुळे सूर्याची थेट किरणे पडून काचा तापणार नाहीत पण आत पुरेसा उजेड येऊ शकेल. २०१६ मध्ये या इमारतीचे काम सुरु झाले आणि दोन वर्षात ती तयार झाली आहे.

Leave a Comment