समाधानी वैवाहिक जीवनासाठी देखणी बायको गरजेची

डल्लास – विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असला तरी पाश्वात्य जगात वाढत असलेले घटस्फोटाचे प्रमाण पाहता समाधानी वैवाहिक जीवनात पुरूष आणि महिला कशाला प्राधान्य देतात हा संशोधनाचा विषय झाला नाही तरच नवल. संशोधकांनी या संदर्भात ४५० जोडप्यांची निरीक्षणे नोंदविली आहेत. नवीन लग्न झाल्यापासून विवाहाला चार वर्षे पूर्ण होईपर्यंत ही निरीक्षणे नेांदविली गेली. त्याचबरोबर या काळात या जोडप्यांना एक प्रश्नावलीही दिली गेली होती व त्याची उत्तरेही तपासली गेली.

या निरीक्षणातून असे आढळले की ज्या पुरूषांच्या बायका देखण्या आहेत, ते वैवाहिक जीवनात अधिक समाधानी आहेत. नवीन लग्न असताना देखणी बायको असल्याने ते समाधानी होतेच पण लग्न जसे जुने होत गेले तसे हे समाधानही वाढत गेलेले आढळले. विवाहित बायकांनी मात्र नवर्‍याच्या देखणेपणाला महत्त्व दिले नसल्याचेही या निरीक्षणांतून सिद्ध झाले. या उलट सपोर्टिव्ह, केअरिंग नवर्‍याला महिलांची अधिक पसंती होती आणि ज्यांना असे नवरे मिळाले त्या नवरा देखणा नसूनही वैवाहिक जीवनात समाधानी होत्या असे दिसून आले. ज्यांचे नवरे अधिक देखणे होते ते पुरेसे सपोर्टिव्ह नसल्याचा अनुभव महिलांना आला व असे नवरे लाभलेल्या महिला कमी समाधानी होत्या असेही आढळले.

हे संशोधन जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अॅन्ड सोशल सायकॉलॉजी मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Leave a Comment