जमीन वादावरून वेगळे होणार गोदरेज बंधू


देशातील दिग्गज उद्योगसमूह गोदरेज अँड बॉयसचे वारसदार वेगळे होण्याच्या मार्गावर असून त्यासाठी नामांकित सल्लागार आणि लॉ फर्मकडून सल्ला घेतला जात आहे. गोदरेज परिवार वेगळा होण्यामागे २० हजार कोटी रकमेची जमीन कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईत गोदरेज लँड लॉर्ड म्हणून ओळखले जातात. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सर्वाधिक जमीन गोदरेज यांच्याकडे आहे. मिडिया रिपोर्ट नुसार गोदरेज समूहाकडे मुंबईत ३४०० एकराहून अधिक जमीन असून त्यातील ३ हजार एकर विक्रोळी मध्ये आहे.

व्यवसायातील हिस्सेदारी पुनर्गठणासाठी गोदरेज बंधू सल्लागार सेवा घेत आहेत त्यात कमर्शियल, होल्डिंग लँडसंबंधी चर्चा केली जात आहे. भूखंड विकसित करण्याबाबत प्रत्येक भावाचे मत वेगळे आहे. जमशेद परिवाराला भूखंड रहिवासी इमारतीत विकसित करण्यात रस नाही तर त्यांचे भाऊ आदी आणि नादिर याचे मत बरोबर उलटे आहे. गोदरेज प्रॉपर्टीज ची जबाबदारी सांभाळत असलेले आदि आणि नादिर यांनी मुंबईतील सर्वात बडे विकसक बनण्याची इच्छा जाहीर केली आहे. भांडूप, नादुर येथेही गोदरेज समूहाच्या जमिनी आहेत. आदि गोदरेज आणि नादिर गोदरेज या समूहातील गोदरेज कन्झ्युमर, गोदरेज प्रॉपर्टीज आणि गोदरेज अॅग्रोवेट या तीन लिस्टेड कंपन्यांची जबाबदारी पाहतात तर जमशेद समूहाचे चेअरमन आहेत. गोदरेज आणि बॉयस होल्डिंग कंपनीवर सर्व परिवाराचा मालकी हक्क आहे.


जमशेद, अदि आणि नादिर यांच्याशिवाय त्यांचे चुलत भाऊ आणि प्रत्येकाची मुले या मालक यादीत आहेत. गोदरेज हा १२२ वर्षे जुना उद्योग असून त्याची सुरवात १८९७ मध्ये युवा पारसी वकील आर्देशीर गोदरेज यांनी केली होती. त्यावेळी कंपनी कुलुपे बनवीत असे. यापुढे कंपनीने उद्योगाचा विस्तार करताना साबणापासून ते एअरोस्पेस पर्यंत अनेक क्षेत्रात विस्तार केला आहे. २००८ मध्ये चांद्रयान १ साठी कंपनीने लाँच व्हेईकल आणि लुनार ऑर्बीटर बनविला होता. गोदरेज समूहाचे बाजार मूल्य १२ लाख कोटी इतके आहे.

Leave a Comment