गुगल मुलगा आहे


हेडिंग वाचून कुणालाही हा काय प्रकार असे वाटू शकेल. पण तुम्ही वाचताय ते अगदी सत्य आहे कारण इंडोनेशियातील एका वडिलांनी त्यांच्या मुलाचे नाव गुगल ठेवले आहे. या मुलाचा जन्म ३० नोव्हेंबर २०१८ ला झाला आहे. मुल जन्माला आले कि आपल्या बाळासाठी काहीतरी युनिक नाव ठेवावे असे कोणत्याही आईवडिलांना वाटते. या मुलाचे वडील अँडी सुपात्रा यांचीही अशीच इच्छा होती. बाळ जन्माला येण्याअगोदर यांनी मुलगा असेल तर तंत्रज्ञान संदर्भात नाव ठेवायचे असे ठरविले आणि त्यादृष्टीने विंडो, आयओएस, आयफोन, मायक्रोसॉफ्ट अशी नावे शोधली. पण प्रत्यक्ष बाळ जन्मले आणि वडिलांनी त्याला प्रथम पहिले तेव्हा त्याला गुगल हेच नाव अधिक समर्पक आहे असे त्यांना वाटले. अर्थात हे नाव घरात कुणालाच आवडले नाही. इतकेच काय ज्यांना हे नाव कळले त्या सर्वांनी यथेच्छ टिंगल केली. पण या नावाला वर्ल्डस स्ट्राँगेस्ट नेमचा पुरस्कार मिळाला आहे.


इंडोनेशियात सर्वसाधारण देव, देवदूत यावरून नावे ठेवण्याची प्रथा आहे. गुगलचे वडील सांगतात, मला माझा मुलगा सर्वाना मदत करणारा, लोकांच्या उपयोगी पडणारा व्हावा असे वाटते. आजच्या तारखेला गुगल हा शब्द सर्वाधिक लोकप्रिय आहे कारण ते जगतील सर्वाधिक सक्षम सर्च इंजिन आहे. ते जगातील सर्व लोकांना मदत करते आहे, त्यांच्या उपयोगी पडते आहे. माझ्या मुलाच्या गुगल नावापुढे मी आडनाव जोडलेले नाही कारण त्यामुळे गुगल या शब्दाचे वजन कमी होईल असे मला वाटते. सुरवातीला लोकांनी टीका केली पण आता त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे हे नाव निवडल्याचा मला अभिमान वाटतो. माझी ओळख आता गुगलचा पिता अशी मी सांगू शकतो.

गुगलची आई एला सांगते, सुरवातीला मला हे नाव विचित्र वाटले. त्यामुळे लोकांनी बाळाचे नाव विचारले कि मी बेबी बॉय असे सांगत असे. दुसरया मुलाचे नाव व्हॉटसअप ठेवा असेही सल्ले आम्हाला मिळाले. गुगलला मोठी बहिण आहे पण तिचे नाव पारंपारिक इंडोनेशियन आहे. इंडोनेशिया मध्ये विचित्र नावे ठेवण्याचा ट्रेंड आहेच. तेथे मुलांची एशियन गेम्स, अँडी गो टू स्कूल, गो पे, पजेरो स्पोर्ट अशीही नावे ठेवली गेली असून गो पे आणि पजेरो ने या मुलांच्या आईवडिलांना असे नाव ठेवले म्हणून गिफ्ट पाठविल्या होत्या असेहि समजते. गुगल च्या आईवडिलांना गुगलने काय दिले हे अजून समजलेले नाही.

Leave a Comment