यामुळे सोडली मी ती इंडस्ट्री


आपल्या पिंच या शोमुळे अरबाज खान अनेकदा चर्चेत येतो. त्याच्या शोमध्ये नुकतीच सनी लिओनही गेली होती. अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये आतापर्यंत सहभाग घेतला आहे. पण सनी लिओन येणार म्हटल्यावर सगळ्यांच्याच नजरा या शोकडे लागून राहिल्या होत्या. सनीने पिंच शोमध्ये फक्त आपल्या भूतकाळातील कामाबद्दलच चर्चा केली नाही तर सोशल मीडियावर तिला ज्या पद्धतीने ट्रोल केले जाते आणि त्याला ती कशी सडेतोड उत्तर देते याबद्दल सांगितले.

सेलिब्रिटी या शोमध्ये सोशल मीडियावर त्यांना आलेल्या कमेंट वाचतात आणि त्यावर उत्तर देतात. तिला एक विचित्र प्रश्न विचारण्यात आला. यात लिहिले होते की, सनीला आधीच पॉर्नवर बंदी घालण्यात येणार असल्याचा अंदाज आल्यामुळेच तिने आपले करिअरच बदलले का?’ सनी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाली की, हो बरोबर आहे. मी दूरदर्शी आहे.

सनीने या एपिसोडमध्ये ट्रोलर्सना उत्तर देण्यासोबत आपल्या भूतकाळावर आणि घेतलेल्या निर्णयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. सनी भूतकाळ आणि भविष्यकाळाबद्दल बोलताना म्हणाली की, नेहमीच असे निर्णय तिने घेतले जे त्या वेळेसाठी योग्य होते. त्यामुळे पॉर्नस्टार होण्याचा निर्णयही मी विचारपूर्वक पद्धतीनेच घेतल्याचे ती म्हणाली. तसेच त्या इंडस्ट्रीमधून बाहेर पडण्याचा निर्णयही आपण विचार करून घेतला होता.

अनेक मुलाखतींमध्ये सनीने सांगितले की, मी कोणताही निर्णय घाईत घेत नाही. तसेच एखाद्या गोष्टीबद्दल संभ्रम असेल तर ती निकटवर्तीयांशी त्याबद्दल बोलायलाही लाजत नाही. ती यातही पती डेनियलचा सल्ला नक्कीच घेते. सनीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती ‘कोका कोला’ नावाच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यात ती बिहार, उत्तर प्रदेशमधील भाषा बोलताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी ती फार मेहनत घेत असून एक वेगळा प्रयोग करताना सनी यात दिसणार आहे.

Leave a Comment