सुष्मिताचे रोहमन शॉलला सोबत ब्रेकअप!


आम्ही आजवर तुम्हाला बी टाऊनमधील अनेक कलाकारांच्या ब्रेकअप आणि पॅचअपच्या बातम्या दिल्या आहेत. त्यातच आता आणखी एका ब्रेकअपची भर पडली आहे. सध्याच्या घडीला बी टाऊनमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल यांच्यादेखील नात्यात दुरावा असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. रोहमनला सुष्मिताने इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. तसेच त्यांच्यात काहीतरी रोहमनच्या इन्स्टास्टोरीमुळे बिनसल्याचे समजते आहे. सुष्मिता आणि रोहमन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते.

सुष्मितापेक्षा रोहमन हा तब्बल १५ वर्षांनी लहान आहे. दोघेही आत्तापर्यंत बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. सुष्मिता नेहमी दोघांचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते.

सोशल मीडियात त्यांचे एकमेकांसोबत व्यायाम करतानाचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. ते दोघे अलिकडेच तिच्या भावाच्या लग्नातही एकत्र दिसले. तर, रोहमन तिच्या दोन्ही दत्तक मुलींचीदेखील काळजी घेताना दिसत होता. मग, असे काय झाले की सुष्मिता आणि त्याच्या नात्यात दुरावा आला? असा प्रश्न सध्या चाहत्यांना पडला आहे. रोहमनला सुष्मिताने इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर रोहमनने त्याच्या इन्स्टास्टोरीमध्ये काही पोस्ट शेअर केल्या आहेत. त्याच्या या पोस्टवरुन देखील सुष्मिता त्याच्यासोबत बोलत नसल्याचे समजते. त्यामुळे रोहमन भावुक झाला आहे.

Leave a Comment