फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची व्यक्तिरेखा साकारणार विकी कौशल


उरी द र्सजिकल स्ट्राईकमध्ये साकारलेल्या दमदार अभिनयानंतर अभिनेता विकी कौशल सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. आता हाच विकी कौशल उरीमधला तोच जोश घेऊन एका नव्या भूमिकेत तुमच्या समोर येणार आहे. दिग्दर्शिका मेघना गुलजार 1971 मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या संग्रामात पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारे भारतीय सैन्याचे पहिले फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार आहे. अभिनेता विक्की कौशल या चित्रपटात सैम मानेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

मेघना गुलजार यांनी ‘मुंबई मिरर’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या भूमिकेबद्दल विक्कीला विचारण्याआधी मला कथेचा ड्राफ्ट पुर्ण करायचा होता. मी त्याला भेटून सॅम मानेकशॉ विषयी सांगितले. तो त्याच दिवशी चित्रीकरणासाठी अमेरिकेला जायला निघणार होता त्यामुळे त्याला स्क्रिप्ट वाचायला वेळ मिळणार नव्हती. पण स्क्रिप्ट न वाचताच त्याने भूमिका साकारायला होकार कळवला. मी त्याला स्क्रिप्ट वाचून, पुन्हा एकदा याबद्दल विचार करून फोन करण्यास सांगितले. ती स्क्रिप्ट त्याने वाचली आणि त्याला कथा आवडल्याचे मला कळवले.

त्यातच आज सॅम मानेकशॉ यांची पुण्यतिथी असून त्यानिमित्ताने विक्कीने नुकताच त्याचा चित्रपटातील फर्स्ट लूक सोशल मिडियावर शेअर केला.


मला भारताचे पहिले फिल्ड मार्शल, सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारायची संधी मिळाली आहे. पडद्यावर मला एक सच्चा देशभक्त साकारायला मिळणार आहे. मी या निर्भय देशभक्ताचा प्रवास मोठ्या पडद्यावर उलगडण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. त्यांची भूमिका मी साकारतो आहे याचा मला अभिमान असल्याचे म्हणत त्याने मानेकशॉ यांचे वर्णन केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार असून चित्रपटाच्या चित्रीकरणाला २०२१ मध्ये सुरुवात होणार आहे.

Leave a Comment