टप्पूसोबत डेटवर गेली बबीता


प्रेक्षकांनी छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक भूमिका डोक्यावर उचलून घेतली. यामधील ‘बबीता’ची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता व टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत हे नुकतेच डेटवर गेले होते. या डेटचे काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

दोघंही व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. दोघांचा हा फोटो तिथे काय खावे, काय ऑर्डर द्यावी याचा विचार करत असतानाचा आहे. हे मुनमुनने दिलेल्या कॅप्शनवरून कळते की दोघेही खवय्ये आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ‘तारक मेहता..’च्या मालिकेत मुनमुन काम करत आहे. तर २०१७ मध्ये मालिकेत राजने एण्ट्री केली. राज या मालिकेत टप्पूची भूमिका साकारत आहे. याआधी भव्य गांधी टप्पूच्या भूमिकेत होता.

मुनमुन व राज यांच्यात शूटिंगदरम्यान चांगलीच मैत्री झाली. या फोटोंमध्येही हीच मैत्री पाहायला मिळत आहे. सध्या ‘तारक मेहता..’ मालिकेत प्रेक्षकांना दयाबेनच्या वापसीची उत्सुकता लागली आहे. दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी मालिकेत परत येणार अशी चर्चा होती.

Leave a Comment