मलायकाने दिली अर्जुनसोबतच्या प्रेमाची कबुली


अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या अफेअरची चर्चा बऱ्याच दिवसापासून बॉलिवूडमध्ये सुरू होती. अर्जुन आणि मलायकाच्या नात्याच्या चर्चा अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर सुरू झाल्या होत्या. थेट लग्नापर्यंतदेखील या चर्चा पोहोचल्या होत्या. पण दोघांनी अद्यापपर्यंत केव्हाच आपले प्रेम जगासमोर मान्य केले नव्हते. पण मलायकाने पहिल्यांदाच अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त अर्जुनसोबतचा एक फोटो शेअर करून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

काल अर्जुन कपूरचा वाढदिवस होता. मलायकाने त्याच्या वाढदिवसानिमित्त दोघांचाही न्युयॉर्क येथील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.


आपले फोटो नेहमीच हे दोघे सोशल मीडियात शेअर करत असतात. पण एकमेकांसोबतचे फोटो दोघांनीही आत्तापर्यंत शेअर केले नव्हते. पण आता मलायकाने अर्जुनसोबतचा फोटो शेअर करून अप्रत्यक्षरित्या त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. यावर आता अर्जुन काय प्रतिक्रिया देणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Leave a Comment