कुमार स्वामी म्हणतात, मतदान मोदींना अन् मदत माझ्याकडे कसली मागता


नवी दिल्ली – बुधवारी रायचूर जिल्ह्यात जमलेल्या जमावासमोर बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची जीभ घसरली. जमलेल्या जमावासमोर भडकलेल्या कुमारस्वामींनी आपला संताप व्यक्त करत नरेंद्र मोदींना तुम्ही मतदान केले आणि मग माझ्याकडे मदत का मागता, असा सवाल केला. स्थानिक वृत्तवाहिनीने याचा व्हिडिओ शेअऱ केला आहे.

आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री कुमारस्वामी एका ठिकाणी जात होते. काही लोकांनी त्याचवेळी त्यांची गाडी अडवली त्याचबरोबर घोषणाबाजी केली. त्यावर संतापलेल्या कुमारस्वामींनी म्हटले की, तुम्ही सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान केले आहे.

दरम्यान कुमारस्वामी यांनीच हे म्हटले आहे का हे स्पष्ट होऊ शकले नाही. पण हे वक्तव्य कुमारस्वामी यांचेच असल्याचा दावा स्थानिक वृत्तवाहिनीने केला आहे. नरेंद्र मोदींना तुम्ही सर्वांनी मतदान केले. मी तुमचा सन्मान करायला हवा का, तुमच्यावर लाठीचार्ज करण्याची गरज आहे का, नरेंद्र मोदींना मतदान करून आणि मदत माझ्याकडून हवी का, असे प्रश्न कुमारस्वामी यांनी स्थानिकांना विचारल्याचे येथील वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. यावर भाजपने कुमारस्वामी यांच्यावर टीका केली आहे. तसेच कुमारस्वामी हताश झाल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment