आता या दिवशी रिलीज होणार ‘खानदानी शफाखाना’


काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला सोनाक्षी सिन्हा, वरूण शर्मा आणि बादशाह यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘खानदानी शफाखाना’ चित्रपटाचे पहिले पोस्टर आले होते. त्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पहिल्यांदा हा चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित होणार होता. पण या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये आता बदल करण्यात आला आहे. नुकतीच चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.


एका आगळ्या वेगळ्या विषयावर सोनाक्षीचा खानदानी शफाखाना हा चित्रपट आधारित आहे. आता हा चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी रिलीज होणार आहे. आपल्या पूर्वजांची संपत्ती नावावर करून घेण्यासाठी सोनाक्षीसमोर ६ महिने त्यांचं सेक्स क्लिनीक चालवण्याची वेळ येते. अशात सोनाक्षी कशा प्रकारे या गोष्टी हाताळते आणि यादरम्यान होणारे अनेक विनोदी संवाद या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात.

नेहमीच्या रटाळ प्रेमकथांपेक्षा या चित्रपटाची कथा वेगळी आणि विनोदी असल्याने काहीसे वेगळेपण या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार एवढे मात्र नक्की आहे. शिल्पी दासगुप्ता द्वारा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, महावीर जैन आणि म्रद्यदीप सिंह लांबा यांनी केली आहे.

Leave a Comment