तुम्हाला जर कुत्रा चावला तर तुम्ही कुत्र्याचा चावा घ्या; डॉक्टरांचा अजब सल्ला


जयपूर : तुम्हाला जर कुत्रा चावला तर तुम्ही त्या कुत्र्याचा चावा घ्या असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर याचे तुम्ही याचे काय उत्तर द्याला? त्यातच तुम्हाला जर हा सल्ला एका डॉक्टरने दिला तर मग तुम्ही हा सल्ला ऐकणार का? असेच काहीसे घडले आहे राजस्थानमध्ये. कुत्रा चावलेल्या रूग्णावर उपचार करण्याऐवजी या डॉक्टरने त्याला दिलेल्या सल्ल्यावरून डॉक्टरवर टीकेची झोड उठली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारला या साऱ्या प्रकरणाची दखल घ्यावी लागली.

राजस्थानमधील अजमेर येथील एका महिलेला कुत्रा चावला म्हणून उपचारासाठी ही महिला डॉक्टरकडे गेली. पण, तेथे असणाऱ्या डॉक्टरने महिलेवर उपचार करण्याऐवजी त्याने तिला कुत्रा तुम्हाला चावला तर तुम्ही कुत्र्याला चावयचे, असा सल्ला दिला. या डॉक्टरवर या घटनेनंतर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. मुख्य बाब म्हणजे अजमेर हा राजस्थानचे आरोग्य मंत्री रघु शर्मा यांचा जिल्हा आहे.

Leave a Comment