कामावर जाण्यास उत्साह देणारी ही काही ऑफिसेस


देशात अनेक कंपन्या, सरकारी विभाग आणि अन्य उद्योग यांची कार्यालये आहेत. काही काळापूर्वी ऑफिस म्हटले म्हणजे एक साचेबंद आकृती समोर येत असे. आजकल मात्र नोकरीसाठी येणाऱ्या कर्मचारी वर्गाचा, त्याच्या सुखसुविधांचा विचार करून ऑफिसेस बनविण्याचा ट्रेंड आहे. ही ऑफिस अश्या प्रकारे सजविली जातात की तेथे काम करताना उत्साह वाटतोच, पण कामही अधिक क्षमतेने, वेगाने आणि नेटकेपणाने केले जाते. देशातील अश्या काही खास युनिक ऑफिसेस संबंधी जाणून घेणे मनोरंजक ठरेल.

मुंबईतील परिमल एन्टरप्रायझेसचे कार्यालय भारतात बहुसंखेने असलेल्या गावे या थीमवर आधारलेले आहे. येथे भिंतीवर ग्रामीण जीवन दर्शविणारी सुंदर चित्रे आहेत. याचे डिझाईन मानवी जीवन आणि निसर्ग यांना जोडण्याचा प्रयत्न आहे. अनेक जागी येथे शॉवररूम्स आहेत आणि फ्री फूड सुविधा दिली जाते. कार्यालयात अनेक प्रकारची झाडे, रोपे आहेतच पण ग्राफिक आर्टसह इंटेरियर मध्ये अनेक रंगांचा वापर केला गेला आहे. कर्मचारी वर्गाला मानसिक ताण येऊ नये यासाठी चांगले वातावरण असावे असा याचा उद्देश आहे. कर्मचारी वर्गाच्या स्वस्थ जीवनासाठी जिम, स्पोर्ट्स रूम, मसाज रूम यांची व्यवस्था केली गेली आहे.


बंगलोर येथील लुकअप कंपनीचे ऑफिस असेच आकर्षक आहे. त्यात सर्वात मोठे आकर्षण आहे ते मध्यात बनविलेले अँफी थियेटर. येथे लाल रंगाचे मोठे फोन बूथ आहेत आणि त्यावरून स्काईप कॉल करण्याची सुविधा कर्मचारी वर्गाला आहे. संपूर्ण ऑफिस मध्ये हँगिंग प्लान्टस लावली गेली असून त्यामुळे इंटेरियर ला कुल लुक मिळाला आहे.


हैद्राबाद येथे अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी पेगा सिस्टीमचे ऑफिस आहे. येथे प्रत्येक कॉन्फरन्स रूमला प्रसिद्ध भारतीय अथवा हैद्राबादमधील स्थळांची नावे दिली गेली आहेत. जमिनीवरील मॅट पासून छतापर्यंत कलरफुल सजावट आहे. येथे कर्मचारी वर्गाला कॅफे टेरीया मध्ये मोफत नाश्ता दिला जातोच पण थकवा दूर करण्यासाठी फुटबॉल, टेबल टेनिस, सापशिडी, लुडो असे खेळ खेळण्याची सोय आहे.


गुडगाव येथील मायक्रोसॉफ्टचे कार्यालय विविध झाडे, झुडपे यांनी नटलेले असून त्यामुळे निसर्गाच्या जवळ असल्याचा फील येतो. इंटेरियर मध्ये नारिंगी रंगाचा अधिक वापर केला गेला आहे. अनेक जागी संस्कृत श्लोक लिहिले गेले आहेत. कर्मचारी वर्गाला लाउंज, कॅफे, फोनरूम सुविधा आहेत त्याचबरोबर सोफा, खुर्ची, हाय चेअर, स्टूल असे कुठेही बसून काम करण्याची परवानगी आहे.


चेन्नईतील फ्रेश डेस्कच्या कार्यालयात खांबांवर तसेच भिंतींवर बांबू सारख्या झाडांची सजावट केली आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्यांना शांत वाटते. कर्मचारी कंटाळा आल्यास टेबल टेनिस, मिनी गोल्फ, फुटबॉल या खेळांचा आनंद घेऊ शकतात. येथील भिंतींवर पॉप कल्चर आर्ट केले गेल्याने एक वेगळा अनुभव येतो.


बंगलोर मधील फॅशन क्षेत्रातील मिन्त्राचे इंटेरियर चंदेरी रंगाचे असून या चार मजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर फॅशन संबंधित कोणती ना कोणती गोष्ट पाहायला मिळते. ऑफिस मध्ये येणाऱ्यांचे स्वागत लाइव व्हिडीओ शूट करून केले जाते. तळमजल्यावर रनिंग ट्रॅक असून ऑफिसची थीम थिंक, क्रिएट, ड्रीम, डिझाईन ही आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याना त्या दिशेने काम करण्याची प्रेरणा मिळते.


हैद्राबाद मधील गुगलचे ऑफिस रंगीबेरंगी इंटेरियरने नटलेले आहे. येथे इनडोअर क्रिकेट पीच, टेबल टेनिस, फुटबॉल, पूल खेळण्याची सोय आहे. यामुळे कर्मचारी कामाने दमले असतील तर विविध खेळ खेळून मेंदूवरील ताण कमी करतात. येथे कर्मचारी शारीरिक दृष्ट्या फिट राहावेत म्हणून दर १५ दिवसांनी योगा, झुम्बा सेशन घेतली जातात. येथे ट्रेडमिलवर लॅपटॉप अॅटॅच करण्यची सुविधा आहे त्यामुळे कर्मचारी काम करतानाही व्यायाम करू शकतात.

Leave a Comment