नवा आशियाना ‘गुलीटा’ मध्ये शिफ्ट होणार इशा – आनंद


देशातील सर्वात बडे उद्योजक मुकेश अंबानी यांची लाडकी लेक इशा आणि जावई आनंद पिरामल यांचा नवा आशियाना ‘ गुलीटा ‘ आता तयार झाला असून लवकरच हे जोडपे तेथे राहायला जाणार असल्याचे समजते. द. मुंबईत वरळी सीफेस वर असलेला हा अलिशान महाल अजय पिरामल आणि त्यांची पत्नी स्वाती यांनी मुलगा आनंद याला लग्नाची भेट म्हणून दिला आहे. २०१२ मध्ये त्यांनी ही इमारत हिंदुस्तान लिव्हर करून ४५० कोटी रुपयात खरेदी केली होती.


इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाह १२ डिसेम्बर २०१८ मध्ये झाला आणि या विवाहाची चर्चा देशभर सुरु होती. अतिशय धूमधडाक्यात पार पडलेल्या या लग्नसमारंभाला बॉलीवूड सेलेब्रिटी, राजकीय नेते तसेच देशी विदेशी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इशा आनंद यांचे नवे घर पाच मजली असून ते ५० हजार चौरस फुट आकाराचे आहे. या इमारतीचा काचेचा मुखवटा विशेष आकर्षक आहे. त्यात उंच छत असलेला विशाल हॉल, एक मोकळ्या हवेतील स्विमिंग पूल अन्य आधुनिक सुविधा आहेत. तळमजल्यावर एन्ट्रन्स लॉबी, पुढच्या मजल्यावर प्रशस्त डायनिंग हॉल, मास्टर बेडरूम, डायमंड थीम वर आधारित एक खास रूम, स्विमिंग पूल, १ मंदिर, आणि तीन पातळ्यात असलेले बेसमेंट, पार्किंग आहे. लाउंज, ड्रेसिंग रूम अतिशय सुंदरपणे सजविल्या गेल्या आहेतच पण प्रत्येक मजल्यावर नोकरांसाठी राहण्याची सोय आहे.


अरबी समुद्राकडे तोंड करून असलेल्या या इमारतीतून समुद्राची अनेक रूपे सहज न्याहाळता येणार आहेत. मुकेश अंबानी यांचे अँटीलिया भारतातीलच नाही तर जगातील महागड्या निवासस्थानांपैकी एक असून इशा आनंद यांचे गुलाटी सुद्धा देशातील महागड्या घरांच्या यादीत समाविष्ट आहे.

Leave a Comment