आलीयाने केला स्वतःचा युट्युब चॅनल लाँच


अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालेली आणि आता कपूर फॅमिलीची सून होणार असल्याने अधिक चर्चेत आलेली गुणी बॉलीवूड अभिनेत्री आलीया भट्ट हिने तिच्या चाहत्यांबरोबर प्रत्येक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपर्कात राहता यावे म्हणून बुधवारी तिचा पहिला यु ट्यूब चॅनल सुरु केला आहे. असा चॅनल सुरु करणारी ती बॉलीवूड मधली पहिली कलाकार ठरली आहे. तिने हा चॅनल आलीया बे नावाने लाँच केल्यावर पहिल्याच दिवशी तिला ८७ हजाराहून अधिक सबस्क्रायबर मिळाले आहेत तर दोन लाखाहून अधिक चाहत्याचे लाईक मिळाले आहेत.

आलीया या चॅनलच्या माध्यमातून तिच्या चित्रपटाच्या सीन मागचे प्रसंग, सेटवर केली जाणारी मौज मस्ती याचे व्हिडीओ शेअर करणार आहे. तसेच तिच्या खासगी आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी सुद्धा शेअर करणार आहे. आलीया ट्विटर, इन्स्टाग्राम वर पूर्वीपासूनच अॅक्टीव्ह आहे.


यु ट्यूबवरच्या पहिल्या व्हिडीओ मध्ये आलीया म्हणते, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी माझी फिटनेस सिक्रेट्स, लाइफस्टाइल व काही महत्वाच्या बाबींवर चर्चा करणार आहे. २ मिनिटे आणि ४२ सेकंदाच्या या व्हिडीओ मध्ये आलीया सांगते इन्स्टाग्राम, ट्विटरवर मला चाहत्याचे खूप प्रेम मिळाले आहे. आता युट्यूबवरून ही मी चाहत्यांशी संपर्कात राहणार आहे. मी माझे आयुष्य कसे जगते आहे याची माहिती माझ्या चाहत्यांना त्या माध्यमातून मिळेल. आलियाने या व्हिडीओ मध्ये अक्षयकुमारचे प्रसिद्ध टीप टीप बरसा पानी हे गाणे रिक्रीएट केले आहे.

बॉलीवूड मधील बरेच स्टार सोशल मिडीयावर सक्रीय आहेत तर काही स्टार या प्लॅटफॉर्म पासून दूर आहेत. मात्र सोशल मिडियाबरोबरच यु ट्यूब वर अॅक्टीव्ह होणारी आलीया पहिलीच अभिनेत्री आहे.

Leave a Comment