इस्लामिक देशात लग्नानंतरचा वाद टाळण्यासाठी वधू आधीच वदवून घेत आहे अटी


रियाध – आता आपल्या अटीनुसार इस्लामिक देश असलेल्या सौदी अरेबियातील महिला लग्न करत आहेत. आता त्या आपल्या होणाऱ्या पतीशी विवाहानंतर वाहन चालवणे, शिक्षण, नोकरी व फिरण्याच्या स्वातंत्र्यासाठी कायदेशीर करार करत आहेत. कोणत्याही प्रकारचा वाद लग्नानंतर उद्भवू नये यासाठी हा उपाय योजला जात आहे. गेल्या वर्षी महिलांच्या वाहन चालवण्यावरील बंदी गेल्या अनेक दशकांच्या बंदीनंतर उठवली होती. महिलांनी यानंतर मोठ्या संख्येने वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी अर्ज केले होते. रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्या महिलांची संख्याही वाढत आहे. महिला केवळ सामान्य ड्रायव्हिंगच करत नाहीत तर त्या भरधाव गाडी चालवत स्टंटही करत आहेत.

सेल्समनचे काम करणारे मज्द यांच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या तयारीत तो गुंतला होता, त्याच्या होणाऱ्या पत्नीने त्यादरम्यान अनोखी अट घातली. मुलीने मागणी केली हाेती की, लग्नानंतर मज्द तिला गाडी चालवण्यास, नोकरी करण्यास परवानगी देईल. मज्दने तिच्या मागणीकडे लग्नानंतर डोळेझाक करू नये यासाठी तिने विवाह करारही केले आहे. वाग्दत्त वराशी अन्य एका तरुणीने करार केला. तो कधीही दुसरा विवाह करणार नसल्याची त्यात अट घातली. या प्रकरणी मौलवी अब्दुलमोहसेन अल-अजेमी यांच्या म्हणण्यानुसार, काही तरुणी वाहन चालवण्यावरून करार करत आहेत. लग्नानंतर सासरच्या लोकांनी ठरलेल्या अटी मोडल्यास महिला पतीकडून तलाकही घेऊ शकते. इस्लामिक देशांमध्ये लग्नानंतर महिलांचा आवाज दाबण्याची प्रकरणे येत असतात. या कारणास्तव हवा तसा करार करण्याची पद्धत सुरू झाली आहे.

Leave a Comment