देशभरात दिली जाणार स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स


देशात वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्सचे फॉर्मेट लवकरच बदलले जाणार असल्याचे केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने जाहीर केले आहे. देशभरात लवकरच बिना चीपची लॅमीनेटेड कार्ड स्मार्टकार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मध्ये बदलली जाणार असल्याचे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ते म्हणाले या संदर्भात देशातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेल्या आहेत.


त्यानुसार सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना युनिफॉर्म फॉर्मेट मध्येच ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. मंत्रालयाने सर्व राज्यांना कॉमन स्टँडर्ड फॉर्मट डिझाईन जारी केले आहे आणि त्यानुसार नवे परवाने देण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र आणि दिल्ली येथे यापूर्वीच चीप असलेली स्मार्टकार्ड लायसन्स जारी केली गेली आहेत.

रस्ते परिवहन मंत्रालयाने अगोदरच ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सारथी अॅप विकसित केले आहे. त्यामुळे पूर्ण देशातील परवाना धारकांचा डेटाबेस एकत्र केला गेला आहे. सारथी अॅपमध्ये रियल टाईम ऑनलाईन बेसिसवर नकली लायसन्स सह चलन संबंधी सर्व माहिती मिळू शकते.

Leave a Comment