ट्रायंफची रॉकेट ३ टीएफसी बाईक, सादर होण्यापूर्वी विकली गेली सर्व युनिट


ट्रायंफने त्यांच्या नव्या लिमिटेड एडिशन रॉकेट ३ टीएफसी मोटरबाईक ची स्पेसिफिकेशन उघड केली आहेत. मात्र लिमिटेड एडिशन मध्ये या बाईकची फक्त ७५० युनिट बनविली जात असून २५ हजार पौड म्हणजे सुमारे २२.७ लाख रुपये किमतीच्या या बाईकची सर्व युनिट अगोदरच विकली गेली असल्याचे समजते.

या बाईकला २५०० सीसी इंजिन, इंटिग्रेटेड गोप्रो कंट्रोल, टायर प्रेशर मॅनेजमेंट सिस्टीम, किलेस इग्निशन असे मॉडर्न फीचर्स आहेत. कंपनीच्या कस्टम प्रोडक्शन डिपार्टमेंटकडे लिमिटेड एडिशनची जबाबदारी सोपविली गेली होती. बाईकचे डिझाईन क्रुझर स्टाईलचे असून बाईकला राउंड शेप ड्युअल हेडलँप, दमदार लुक, भारीभक्कम फ्युअल टँक, रुंद टायर्स, एलइडी लाईट दिले गेले आहेत. डिजिटल अॅनॉलॉग इन्स्ट्रुमेन्ट् कन्सोल दिला गेला आहे. बाईकचे वजन आहे ३२३ किलोग्राम.


या बाईकला २५०० सीसी इनलाईन ३ सिलिंडर इंजिन, दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक्स, कॉर्निंग एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल आहे. तसेच रायडर, रेन, रोड आणि स्पोर्ट्स असे चार ड्रायविंग मोड दिले गेले आहेत. या सर्व ७५० युनिटची विक्री अगोदरच झाली असून युकेच्या वेबसाईटवर तिची किंमत २५ हजार पौंड लिस्ट केली गेली आहे.

Leave a Comment