भाजप खासदार म्हणतात, … तर मुस्लिमांचे गळे कापू


नवी दिल्ली – एका समुदायाबद्दल चिथावणीखोर वक्तव्य तेलंगणातील भाजप खासदार सोयम बापू राव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी यावेळी गळा कापण्याची धमकी देखील दिली आहे. अल्पसंख्यांक समुदायाच्या नेत्यांनी सोयम बापूच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

सोयम बापू एका सभेला संबोधित करताना म्हणाले, मुसलमानांच्या मुलांना मी एवढेच सांगु इच्छितो, की आमच्या आदिवासी बांधवांच्या मागे लागलात तर, तुमचा गळा कापला जाईल. आमच्या मागे तुम्ही पडू नका, तुमच्या मागे आम्ही पडलो तर, अवघड काम होऊन बसेल, त्यानमुळे तुमचे सुरु असलेले नाटक बंद करा.

तेलंगाणातील आदिवासी जिल्ह्यात मुस्लिम समुदायाच्या मुलांकडून आदिवासी समाजाच्या महिलांचे उत्पीडन होत असल्याचा सोयम बापूंचा आरोप आहे. त्यामुळे याच्याविरोधात आम्ही आहोत. जर यापुढे ही मुस्लिम मुलांचे वागणे असेच राहिले, तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असेही सोयम बापू म्हणाले आहेत.

Leave a Comment