युजर्ससाठी व्हॉट्सअॅप आणत आहे ‘ही’ नवीन पाच फीचर्स


फेसबुकचे प्रसिद्ध मोबाईल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहे. तरुणाईसह अबालवृद्ध देखील या अॅपचा सर्रास वापर करताना दिसतात. व्हॉट्सअॅप आपल्या विस्तरित युजर्स वर्गासाठी नेहमीच नवनवीन फिचर्स घेऊन असते. आता यामध्ये आणखी 5 नवीन फीचर्स येत्या काळात जोडले जाणार असल्याचे कळते. युझर्संना या बदलांमुळे आपले संपर्क व मॅसेजेस सांभाळण्यात मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कित्येक जण या अॅपचा वापर दिवसरात्र कायम करत असतात. पण त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर तणाव येऊन त्यांना त्रास होऊ शकतो. गेल्या कित्येक दिवसांपासून हा त्रास टाळण्यासाठी डार्क मोड हे नवे फिचर आणले जाणार असल्याचे सांगितले जात होते. आपल्या अॅप सेटिंग्समधून डार्क मोड चालू केल्यावर व्हॉट्सअॅपमधील बॅकग्राउंड राखाडी रंगाचे दिसू लागेल. तसेच, हिरव्या रंगात चॅट आयकॉन्स व नावे दिसू लागतील. यामुळे रात्रीच्या अंधारात मोबाईल प्रकाशामुळे डोळ्यांना होणारा त्रास कमी होईल.

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फोटो पाठवताना त्या फोटोचा दर्जा आणि त्याचे रिझोल्यूशन कमी असल्यामुळे फोटो शेअर करण्यासाठी यूजर्स व्हॉट्सअॅप ऐवजी दुसऱ्या अन्य अॅप्सचा वापर करतात. पण व्हॉट्सअॅपमध्ये आता होणाऱ्या बदलामुळे फोटो पाठवताना फुल साईज इमेजचा पर्याय निवडल्यास फोटोचा दर्जा आहे तसा कायम राहण्यास मदत होणार आहे.

या अॅपमधील डेटा सुरक्षित राहावा यासाठी बॅकअपचा पर्याय दिलेला आहे. पण आपणास फोन बदलून अँड्रॉइड मधून आयओएसमध्ये जायचे असल्यास बॅकअपचा वापर करता येत नाही. पण या नवीन फिचरमुळे आता एका प्लॅटफॉर्ममधून दुसऱ्या प्लॅटफॉर्म मध्येही डाटा बॅकअप करणे सहज शक्य होणार आहे.

व्हॉट्सअॅपवर एखादी लिंक तुम्हाला कोणी पाठवली असल्यास अॅप बंद करून ब्राउझिंग करण्याची आता गरज नाही. या फिचर मुळे तुम्ही अॅपमध्येच तुम्ही लिंक उघडू शकता. विशेष म्हणजे तुम्ही या अंतर्गत सर्च केलेल्या गोष्टींची यादी फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवर संग्रहित राहणार नाही. गुगल पे, फोन पे सारखं अर्थिक व्यवहाराची सुविधा ‘व्हॉट्सअॅप पे’ उपलब्ध करून देईल. एकाच अॅपमध्ये पैसे पाठवणे, बिल भरणे, रिचार्ज करणे आणि सोबतच चॅटही करणे असे सगळे आल्यावर यूजर्सना वेगवेगळ्या अॅपची गरज उरणार नाही.

Leave a Comment