घटस्फोटाचा खटला सुरू असतानाच पतीला लागली 556 कोटींची लॉटरी…पण


वॉशिंग्टन- 565 कोटी रूपयांची लॉटरी अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणाऱ्या रिचर्ड डिक जेलास्कोला लागली त्यावेळेस तो खूपच आनंदी झाला. पण त्याच्या आनंदावर न्यायालयाने विरजन घालण्याचे काम केले. कारण रिचर्डला जिंकलेल्या पैशांमधील अर्धे पैसे पत्नीला द्यावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रिचर्डला जेव्हा लॉटरी लागली तेव्हा त्याचा पत्नीसोबत न्यायालयात घटस्फोटाचा खटला सुरू होता.

रिचर्डच्या वकीलाने या निर्णयाविरूद्ध रिव्ह्यू पिटीशन दाखल केली आहे. यात असे सांगण्यात आले आहे की, लॉटरी लागणे हे रिचर्डचे नशीब होते, त्यामुळे यातील हिस्सा पत्नीला देणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. रिचर्ड या निर्णयाविरूद्ध सुप्रीम कोर्टात जाणार आहे.

2004 साली रिचर्डचे लग्न मेरी बेथ जेलास्कोसोब झाले होते. तीन अपत्ये त्यांना आहेत. रिचर्डला 2013 मध्ये जेव्हा लॉटरी लागली, तेव्हा त्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरू होता. त्यावेळी कोर्टाच्या आदेशावरून दोघे दोन वर्षे वेगळे राहीले. दोघांनी आर्बिट्रेटर जॉन मिल्सचा आदेश ऐकण्याचे ठरवले.

Leave a Comment