सोशल मीडियात व्हायरल होत आहे प्रियंकाचा निकसोबतचा रोमान्स


आपली गर्लफ्रेंड सोफी टर्नरसोबत प्रियंका चोप्राचा दीर जो जोनस परत लग्न करणार असून हे लग्न यावेळी पॅरिसमध्ये होणार आहे. प्रियंका चोप्रा लग्नासाठी निक जोनससह संपूर्ण कुटुंब पॅरिसला पोहोंचले आहे. प्रियंका आणि निकचे पॅरिसमधील कोही फोटोज सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. दोघेही ज्यामध्ये रोमांटिक पोजदेखील देत आहेत. या फोटोमध्ये हे स्टार कपल बोटमध्ये बसलेले दिसत आहेत.

एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो निकनेदेखील शेअर केला आहे. दोघांनीही यामध्ये गॉगल लावलेला आहे. तर निक सिगारेट पिताना दिसत आहे. निकने हे फोटो शेअर करून लिहिले, ‘द सिटी ऑफ लव्ह.’ तर इतर फोटोजमध्ये दोघे डान्स करताना दिसत आहे. दोघेही या फोटोजमध्ये खूप खुश दिसत आहेत. प्रियंकाने यावेळी प्रिंटेड रफेल हाय स्लिट ड्रेस घातला आहे. निकने कॅज्युअल शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे. यावेळी दोघे एकमेकांना किस करतानाही दिसले.

यापूर्वीही अनेकदा प्रियंका आणि निकने असे पब्लिकली किस केले आहे. प्रियंका आणि निकचे हे फोटोज वेगाने व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीची प्रियंका निकसोबत पॅरिसमध्ये फिरताना दिसले होते.

Leave a Comment