माजी मुख्यमंत्र्यांचा बंगला जमीनदोस्त करणार आजी मुख्यमंत्री


अमरावती – आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा अमरावती येथील ‘प्रजा वेदिका’ नावाचा बंगला जमीनदोस्त होणार असल्याचे आजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. रेड्डी याविषयी माहिती देताना पत्रकार परिषदेत म्हणाले, प्रजा वेदिका हा अवैधरित्या बांधलेला बंगला असून त्याचे कृष्णा नदीकाठी विनापरवाना निर्माण करण्यात आले असल्यामुळे नदी संवर्धन कायद्याचे उल्लंघन होत आहे.

प्रजा वेदिकाचे तेलुगु देसम पक्षाच्या मागील कार्यकाळात माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या निवासस्थानासमोर निर्माण करण्यात आले होते. टीडीपीच्या अधिकृत बैठकी आणि पक्षाच्या बैठकीसाठी प्रजा वेदिका वापरण्यात येत होता. चंद्राबाबू नायडू यांनी टीडीपीच्या पराभवानंतर ५ जून रोजी पत्र लिहित प्रजा वेदिका बंगल्याला विरोधी पक्षनेत्याचे निवासस्थान म्हणून दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली होती.

टीडीपीचा आंध्रप्रदेश येथे झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेसने १७५ जागांच्या विधानसभा निवडणुकीत १५१ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती.

Leave a Comment