तक्रारदाराने मागे घेतली अभिजित बिचुकलेंविरोधातील तक्रार !


सातारा – खंडणी प्रकरणात कविनेता अभिजित बिचुकलेला मोठा दिलासा मिळाला आहे. बिचुकलेंविरोधातील तक्रार तक्रारदारानेच मागे घेतल्यामुळे बिग बॉसमध्ये अभिजित बिचुकलेचा परतण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा आता रंगली आहे. बिग बॉसची टीम अभिजित बिचुकलेला अटक झाल्यापासून साताऱ्यात ठाण मांडून बसली होती. आता तक्रारदारानेच तक्रार मागे घेतल्याने बिचुकले बिग बॉसच्या घरात दाखल होऊ शकतो अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. न्यायालयात बिचुकलेविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीने स्वतःहून माझी अभिजित बिचकुलेविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे लिहून दिल्यामुळे बिचुकलेला दिलासा मिळाला आहे.

साताऱ्याचे नाव अभिजित बिचुकलेमुळे उंचावले जात होते आणि अभिजित बिचुकले असेच खेळत राहिले तर त्यांना बिग बॉसचे पारितोषिकही मिळेल अशी आशा असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. स्वतःहून बिचुकलेविरोधातील तक्रार मागे घेतल्याचे तक्रारदार मनोज पठाण यांनी न्यायालयात लिहून दिले आहे. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

Leave a Comment