बिल गेट्स यांना होत आहे त्या गोष्टीचा पश्चाताप


आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक मायक्रोसॉफ्टचे को फाऊंडर बिल गेट्स यांनी जाहीरपणे सांगितली आहे. गूगलला अँड्रॉइड परेटींग सिस्टम विकसित करण्याची संधी देणे ही आपल्या आयुष्यातील मोठी चूक होती असे बिल गेट्स यांनी म्हटले आहे. आपल्या आयुष्यातील अँड्रॉइड कंपनी खरेदी न करणे ही सर्वात मोठी चूक असल्याचे बिल गेट्स यांना वाटते. तसेच, त्यांना सतत या गोष्टीचा पश्चाताप होत असल्याचेही ते सांगतात.

दरम्यान, आजही मार्केटमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीची दमदार ओळख आहे. पण ज्या पद्धतीने गूगल व्यवस्थापन अँड्रॉइड सिस्टमबद्दल ज्याप्रकारे पावले टाकत आहे ती सुरवातीलाच ओळखली असती तर, सध्या मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली असती असेही बिल गेट्स यांनी म्हटले आहे. गेट्स यांनी हे मनोगत Early Stage Venture Capital Firm Village Global च्या एका कार्यक्रामात व्यक्त केले आहे.

बिल गेट्स यांनी म्हटले आहे की, बाजारपेठेवर सॉफ्टवेअरच्या जगतातील खास करुन मोबाईल प्लॅटफॉर्ममध्ये विजेताच राज्य करतो. माझी सर्वात मोठी चूक हीच की त्या वेळी मी या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने हाताळू शकलो नाही. म्हणूनच आज त्या उंचीवर मायक्रोसॉफ्ट नाही ज्या उंचीवर अँड्रॉइड आहे. पुढे गेट्स यांनी म्हटले आहे की, त्यावेळी मार्केटमध्ये अॅपल शिवाय केवळ एकाच ऑपरेटींग सिस्टमला स्कोप होता. गूगलने अत्यंत वेगाने त्या एका ऑपरेटींग सिंस्टमची जागा आणि कोणतीही वेळ न घालवता भरुन काढली.

टेक क्रंचने दिलेल्या वृत्तानुसार, गेट्स यांनी म्हटले आहे की, केवळ एकाच नॉन अॅपल ऑपरेटींग सिस्टमसाठी त्यावेळी जागा होती ज्याची किंमत 400 बिलियन डॉलर (भारतीय रुपयांत तब्बल, 27,76,500 कोटी रुपये) होती. बिल गेट्स यांना अँड्रॉइड खरेदी न केल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आणि गूगलने बाजी मारली.

गेट्स यांनी सुमारे एक तास एवढ्या कालावधीत दिलेल्या मुलाखतीत मायक्रोसॉफ्टच्या यशाबाबत कौतुक केले. ते म्हणाले की, कंपनी विंडोज आणि ऑफिस सारख्या प्रॉडक्टमुळे एका उंचीवर पोहोचली. दरम्यान, आजही बिल गेट्स यांना वाईट याचे वाटते की, अँड्रॉइड त्यांनी खरेदी केली नाही. अन्यथा मायक्रोसॉफ्ट ही आज अँड्रॉइडच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असती.

Leave a Comment