चंद्रकांतदादा म्हणतात या दरम्यान होऊ शकतात विधानसभा निवडणूक


पुणे – राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी येथील पत्रकार परिषदेत राज्यात १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान विधानसभा निवडणूक होईल आणि १५ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल असा अंदाज वर्तवला आहे. बरीच उलथापालथ महिनाभरात होईल आणि महायुतीच्या २५० जागा निवडून येतील असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. २३ मे लोकसभा निवडणुकीचा निकाल रोजी लागल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगली आहे. पण ही निवडणूक कधी होणार? हे स्पष्ट व्हायचे होते कारण तशा तारखा जाहीर करण्यात आलेल्या नव्हत्या. पण आता चंद्रकांत पाटील यांनी १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली आहे.

निवडणुकीची तयारी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने सुरू केली आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे. यात मनसेची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. २०१४ मध्ये १५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक झाली असल्यामुळेच यावेळीही १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यानच विधानसभा निवडणूक होईल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Comment