आयपीएस अधिकाऱ्याने बलात्काऱ्याला घातल्या थेट गोळ्या


लखनऊ : उत्तर प्रदेशमधील 6 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या आरोपीला गोळ्या मारुन अटक केली. त्यामुळे आयपीएस अधिकारी अजय पाल शर्मा यांचे या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शर्मा यांची सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. आरोपीचे नाव नाजील असे असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि खून केल्याचा आरोप आरोपी नाजीलवर आहे. एका मुलीचा मृतदेह पोलिसांना गेल्या शनिवारी मिळाला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात आला. आरोपी सिविल लाईन्स विभागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीला अटक करायला पोलीस गेले तेव्हा आरोपीने पोलिसांना पाहून गोळीबार केला. आरोपीवर पोलिसांनीही गोळीबार केला. त्याला यावेळी गोळी लागताच तो जमीनीवर कोसळला आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली.


सध्या देशभरातून अजयपाल शर्मांच्या या कारवाईमुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. शर्मा यांना सोशल मीडियावर सिंघम, देव आणि सुपरमॅनची उपमा दिली जात आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या मोहिमेमुळे नक्कीच गुन्हेगारांना लगाम बसेल.

Leave a Comment