रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरनी पदभार सोडला


मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपला निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच विरल आचार्य यांनी आपले पद सोडले आहे. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी विरल आचार्य यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी २३ जानेवारी २०१७ ला पदभार स्वीकारला होता. पण त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच पद सोडले आहे.

याआधी डिसेंबर महिन्यात काही खासगी कारणांमुळे आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला होता. आरबीआयच्या त्या बड्या अधिकाऱ्यांमध्ये विरल आचार्य यांचा समावेश होतो जे उर्जित पटेल यांच्या टीमचे सदस्य होते. विरल आचार्य आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर पद सोडल्यानंतर आता न्यूयॉर्क विद्यापीठाच्या सेटर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणार आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

Leave a Comment