प्रामणिकता तपासण्यासाठी मिशिगन विद्यापिठाचे भारतासहित 40 देशांचे अध्ययन


ज्यूरिख – एखाद्याचे हरवलेले पाकिट जर आपल्यापैकी कुणाला सापडले तर तुम्ही काय कराल? ते तुम्ही तुमच्याकडेच ठेवाल की ज्याचे आहे त्याला परत कराल? त्यामुळे ‘यूनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनने’ लोकांचा प्रामाणिकपणा आणि त्यांच्या स्वभावाचे अध्ययन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन केले आहे.

भारतासहित 40 देशातील 355 शहरांमध्ये झालेल्या या संशोधनात स्पष्ट झाले की, जर लोकांचे पाकिट हरवले तर, 40 टक्के लोक ते परत करतात. तसेच, त्यामध्ये जर थोडे पैसे असतील तर परत करणाऱ्यांचा आकडा वाढून 51 टक्के होतो. पण जर पैसे अधिक असतील तर 72 टक्के लोक सापडलेले पाकिट परत करतात. संशोधनकर्त्यांनी यासाठी जगभरात प्रामाणिकपणा जाणून घेण्यासाठी सुमारे 17 हजार पाकिटांचा वापर केला.

हरवलेले पाकिट सापडल्यानंतर लोक काय करतात? लोक पाकिट परत करतात की, आपल्याजवळच ठेवतात? त्यासोबतच पर्समध्ये अधिक पैसे असल्यावर काय फरक पडतो? हे या संशोधनता जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी तीन प्रकारच्या पाकिटांचा उपयोग करण्यात आला. एक रिकामे, दुसऱ्यामध्ये एक हजार रूपये आणि तिसऱ्या पर्समध्ये साडे सहा हजार रूपये ठेवण्यात आले. तसेच, सर्व पाकिटामध्ये व्यक्तीच्या ओळखी व्यतिरिक्त किराणा सामानाची यादी, एक चावी आणि काही बिझनेस कार्ड ठेवण्यात आले.

याबाबत माहिती देताना ज्यूरिखच्या ‘यूएम स्कूल ऑफ इंफॉर्मेशनचे’ सहाय्यक प्राध्यापक अॅलेन कोहन यांनी सांगितले की, आर्थिक विकासासाठी प्रामाणिकपणा अत्यंत गरजेचा आहे. तसेच, ज्यूरिख विद्यापिठाचे मिशेल अँड्रे मर्केलनुसार, लोकांची प्रतिक्रिया अशी होती की, ते कितीही वाईट परिस्थीतीमध्ये असले तरी, स्वतःला चोर म्हणून घेणे कधीच सहन करू शकत नाहीत.

Leave a Comment