लवकरच बाजारात येत आहे One Plusचा स्मार्ट टिव्ही


स्मार्टफोन उत्पादनात आपली छाप उमटवणारी चीनी स्मार्टफोन कंपनी OnePlus भारतात लवकरच स्मार्ट टिव्ही लाँच करण्याच्या तयारी आहे. यापूर्वी देखील आम्ही याची तुम्हाला कल्पना दिली होती. त्यावेळी कंपनीने फक्त शक्यता व्यक्त केली होती. पण आता लवकरच One Plusचा स्मार्ट टिव्ही भारतीय बाजारपेठेत दाखल होऊ शकतो.

दरम्यान कंपनीकडून अद्यापही याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण टिप्स्टर ईशान अग्रवाल यांनी एक ट्विट करत म्हटले आहे कि तुम्हाला जास्त वेळ वन प्लसच्या स्मार्ट टिव्हीची वाट पाहावी लागणार नाही. या स्मार्ट टिव्हीच्या फिचर्सबाबत अद्याप कुठलीही माहिती उपलब्ध नाही, पण हा टिव्ही या वर्षाच्या अखेरीस लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत चीनच्या शाओमी आणि वन प्लसमध्ये जोरदार टक्कर पहायला मिळेल ऐवढे मात्र नक्की.

मागील वर्षी आम्ही तुम्हाला OnePlus CEO Pete Lau बद्दल सांगितले होते की, कंपनी 2019च्या दरम्यान वनप्लस टिव्ही सादर करु शकते. त्यानंतर एका वर्तमानपत्राने म्हटले होते की टिव्ही 2020च्या दरम्यान लाँच करु शकते.

भारतात सध्या स्मार्ट टिव्ही क्षेत्रात शाओमी खूप पुढे निघुन गेली आहे, परवडणाऱ्या किंमतीत टिव्ही लाँच केले जात आहेत आणि विकले देखील जात आहेत. अशी आशा आहे कि वनप्लस देखील फुल एचडी टिव्ही आणेल, ज्यामुळे शाओमी समोर मोठी स्पर्धा निर्माण होऊ शकते. कारण वनप्लसचे स्मार्टफोन खूपच महाग आहेत. त्यामुळे कंपनीला विश्वास आहे कि जास्त फिचर्ससह आपल्याला परवडणाऱ्या किंमतीत टिव्ही बाजारात आणून बाजारपेठ काबीज करण्याच्या प्रयत्नात असेल.

Leave a Comment