मनोज तिवारींना जीवे मारण्याची धमकी, बिहारी व्यक्तीला अटक


नवी दिल्ली – दिल्ली पोलीसांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार मनोज तिवारी यानी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आली आहे. या अटक केलेल्या आरोपीचे नाव गुड्डु असे असून तो बिहारच्या बक्सार येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुड्डुकडुन मोबाईलवर संदेशामार्फत मनोज यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही नावाचा यामध्ये समावेश असल्यामुळे तात्काळ पोलिसात मनोज यांनी तक्रार नोंदविली होती. याची गंभीर दखल घेत पोलिसांनीदेखील तपासाची चक्रे फिरवल्यानंतर २५ वर्षीय गुड्डुला त्यांनी अटक केली आहे.

दरम्यान आपण हे सर्वकाही प्रसिद्धीसाठी केल्याचे गुड्डुने सांगितले आहे. पण कोणाच्या सांगण्यावरुन मनोज तिवारींना त्याने संदेश पाठवला होता. त्याचा नेमका हेतु काय होता, याचा तपास दिल्ली पोलीस घेत आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment