दीपिका पादुकोणसोबत ‘या’ अभिनेत्रीला ठेवायचे आहेत समलिंगी संबंध


मागच्या आठवड्यातील शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर तामिळ चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंह’ हा चित्रपट रिलीज झाला. अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांची या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहे. शाहिदच्या या चित्रपटामधील अभिनयाचे सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे. अभिनेत्री कियारा अडवाणीची या चित्रपटामध्ये लहानशी भूमिका आहे. पण प्रेक्षकांच्या मनावर तिची ही लहानशी भूमिकादेखील छाप पाडून गेली असल्यामुळे कियारा सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय झाली आहे. त्यासोबतच चर्चेमध्ये तिचे येण्याचे आणखी एक कारण आहे. कियाराने काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडमधील एका आघाडीच्या अभिनेत्रीसोबत समलिंगी संबंधांमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तिने या मुलाखतीमध्ये तिच्या आयुष्याशी आणि करिअरशीसंबंधित अनेक गोष्टींवर चर्चा केली. तिला यावेळी तिच्या रिलेशनशिप बाबत काही प्रश्न विचारण्यात आले. तिनेदेखील या प्रश्नांवर मनमोकळेपणाने उत्तरे दिली. या प्रश्न-उत्तरांच्या खेळामध्ये रॅपिड फायर राऊंडमध्ये बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रीसोबत तिला समलैंगिक संबंध ठेवायला आवडतील? असा प्रश्न विचारण्यात आला होता. तिने या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न लावता अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाव घेतले.

दरम्यान, सध्या ‘कबीर सिंह’मुळे कियारा तर दीपिका तिच्या आगामी ’83’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या आगामी चित्रपटामध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार असून तो माजी क्रिकेटर कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. तर दीपिका त्याच्या ऑनस्क्रीन पत्नीची म्हणजेच कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे.

Leave a Comment