वॉशिंग्टन(अमेरिका) – कधी असा विचारही येथील मॅसाच्यूसेट्समध्ये राहणाऱ्या एका दांपत्याने केला नव्हता की, त्यांना 60 वर्षानंतर त्यांची हरवलेली अंगठी परत मिळेल. पण हे शक्य एका स्कूबा डायव्हरमुळे झाले. लुक बेरूब असे बॉस्टनमध्ये राहणाऱ्या या स्कूबा डायव्हरचे नाव आहे. डायव्हिंग करताना लुक हे अनेक ठिकाणी आपले मेटल डिटेक्टर घेऊन मौल्यवान वस्तू शोधण्यासाठी समुद्र आणि तलावात उतरतात.
पाणबुड्याला 60 वर्षापूर्वी हरवलेल्या अंगठीमध्ये आढळला त्याच्या मालकाचा पत्ता
नुकतेच स्कूबा डायव्हिंगसाठी बेरूब शहरातील हँसन तालावात उतरले होते. त्यांना तेव्हा 1960 सालची एक अंगठी सापडली. बेरूबनुसार, सोन्याच्या या अंगठीवर शहरात असलेल्या एका शाळेचे नाव कोरलेले होते आणि WJW असे तीन अक्षरे लिहिली असल्यामुळे घरी येऊन बेरूब यांनी शाळेची माहिती काढली. अंगठीवर ओळख दर्शविणारे अक्षरे असल्यामुळे बेरूबला वाटले की, ही अंगठी मालकाकडे पोहचली पाहिजे. त्यानंतर गेट ऑफ हॅवन स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या एका पेजला जॉइन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जेव्हा मॅसेजमध्ये अंगठीचे वर्णन केले असता, त्यांना एका मॉडरेटरने ग्रुपमध्ये घेतले. बेरूब यांनी त्यानंतर हरवलेल्या अंगठीवर एक पोस्ट लिहिली.
ती पोस्ट बॉस्टनच्या दक्षिण भागात राहणाऱ्या विलियम जोसेफ वेडेल यांची मुलगी क्रिस्टीनने पाहिली आणि आपल्या वडिलांना दाखवली. एका क्षणात 77 वर्षांच्या जोसेफ यांनी ती अंगठी ओळखली. क्रिस्टीननुसार, अंगठीची खात्री केल्यानंतर त्यांनी बेरूब यांच्याशी संपर्क केला. ही अंगठी जोसेफ यांनी आपल्या प्रेयसीला दिली होती. पण त्यांच्या प्रेयसीकडून हरवली. त्यानंतर बेरूब यांनी ही अंगठी जोसेफ यांच्याकडे सुपूर्द केली.
बेरुबनुसार, मागील 12-13 वर्षांपासून ते डायव्हिंग करत आहेत. पण त्यांनी मेटल डिटेक्टर घेऊन डायव्हिंग करायला चार वर्षांपूर्वीच सुरूवात केल्यामुळे त्यांच्याकडे आतापर्यंत 100 पेक्षा अधिक अंगठ्या गोळा झाल्या आहेत. पण यातील अधिक अंगठ्यांची ओळख पटली नसल्यामुळे त्यांच्याकडेच आहेत.