ही आहे ५००० किमी अंतराची धावस्पर्धा


जगातील सर्वाधिक अंतराच्या पायी पार करण्याच्या रेस बद्दल किती जणांना माहिती असेल याची शंकाच आहे. तब्बल ५ हजार किमी अंतराची ही रेस श्री चिन्मय सेल्फ ट्रान्सेन्डेंट रेस या नावाने प्रसिद्ध असून स्वतःला सिद्ध करण्यासाठी यात स्पर्धक सहभागी होतात. विशेष म्हणजे न्यूयॉर्क मध्ये होणारी ही रेस अध्यात्मिक गुरु चिन्मयानंद यांच्या नावाने होते. या रेसमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना २० वेळा बूट बदलावे लागतात आणि ही रेस ५२ दिवसात पूर्ण करावी लागते. या काळात आराम आणि दिनचर्या साठी दिवसात फक्त सहा तास मिळू शकतात. म्हणजे रोज सरासरी ९६ किमीचे अंतर पळत अथवा चालत तोडावे लागते. १९९७ मध्ये भारताचे अध्यात्मिक गुरु श्री चिन्मयानंद यांच्या नावाने ही रेस सुरु केली गेली.

१९६० च्या दशकात चिन्मयानंद अमेरिकेत न्यूयॉर्क मध्ये होते आणि तेथेच ते अध्यात्मिक गुरु बनले होते. ते नेहमीच दीर्घ पल्ल्याच्या रेस आणि वेट लिफ्टिंग करत असत. प्रार्थना, ध्यान, योगाने त्यांनी स्वतःला इतके सशक्त बनविले होते कि हत्ती, छोटे विमान, कार अश्या वस्तू ते उचलू शकत असत असे सांगतात. ते सांगत शक्ती आपल्या आतच असते, गरज असते ती ओळखायची, आपले अंतर्मन बलशाली असेल तर कोणतेच काम मुश्कील नाही.


चिन्मयानंदांचे अनुयायी न्यूयॉर्क मध्ये श्री चिन्मय सेल्फ ट्रान्सेन्डेंट रेसचे आयोजन करतात. यात स्पर्धकांना रोज ९६ किमी पळावे किंवा चालवे लागते. जास्त विश्रांती घेतली तर दुसरेदिवशी अधिक मेहनत करावी लागते. सकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंत स्पर्धक पळू, चालू शकतात. २०१५ मध्ये फिनिश पोस्टमन ए आल्तो यांनी ही रेस ४० दिवस ९ तास ६ मिनिटात पूर्ण करून रेकॉर्ड केले आहे. ते रोज १२४ किमी अंतर कापत असत.

२२ वर्षाच्या या रेसच्या इतिहासात ४ हजाराहून अधिक स्पर्धकांनी या रेस मध्ये भाग घेतला आहे मात्र त्यातील ४३ स्पर्धक ही रेस पूर्ण करू शकले आहेत. २०१४ मध्ये ही रेस पूर्ण करणारे स्कॉटलंडचे विलियम सिशेल हे दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात रोमांचक दिवस होते असे सांगतात. सिशेल यांच्या नावावर ३९३ विश्व रेकॉर्ड्स आहेत. स्लोव्हाकियाच्या कानिनिका जानाकोवा या महिलेने २०१७ मध्ये ४८ दिवस २४ मिनिटात हि रेस पूर्ण केली होती.

Leave a Comment