फक्त ६५ रुपयात घरखरेदी


माणसाच्या आयुष्यात ज्या काही प्राथमिक गरजा असतात त्यात अन्न वस्त्र निवारा या प्रमुख मानल्या जातात. त्यातील स्वतःचे घर असावे ही अनेकांची इच्छा असते आणि हे घर बांधण्यासाठी कष्ट करण्याची त्याची तयारीही असते. आपल्या मनासारखे घर हा माणसासाठी आनंदाचा ठेवा बनतो. पण हेच घर काही कारणांनी विकायची वेळ आली तर त्याचा त्रासही होतो. त्यातही खूप खर्च करून उभारलेले हे घर मातीमोल भावाने ज्यांना विकावे लागते त्यांच्या मानसिक यातना तेच जाणोत. सध्या अश्या यातना अमेरिकेच्या डेट्रोइट या एकेकाळच्या संपन्न नगरीतील रहिवासी भोगत आहेत.


अमेरिकेची एके काळाची वाहननगरी डेट्रोइट आता दिवाळखोरीत निघाली आहे हे आपण जाणतो. काळ कधी कुणाला राजाचा रंक बनवेल याचा अंदाज कुणीच करू शकत नाही अशी एक म्हण आहे. या वाहननगरी कडे पहिले कि या म्हणीची सत्यता पटते. आर्थिक मंदीने या शहराच्या उद्योगाचे कंबरडे मोडले आणि हे शहर गतवैभवाच्या नुसत्या खुणा अंगावर वागवीत आहे. येथील ऑटो कारखाने बहुतेक बंद झाले आहेत आणि जे थोडे चालू आहेत त्यात नाममात्र उत्पादन होते आहे. याचा रिअल इस्टेट क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम झाला नसता तरच नवल. त्यामुळे येथे अगदी मातीमोल भावाने घरे विक्रीसाठी आहेत.


या नगरीत विकल्या गेलेल्या १० सर्वात कमी किमतीच्या घरांची माहिती येथे देत आहोत. येथील एका रहिवाश्याने त्याचे घर ईबेवर चक्क १ डॉलर म्हणजे ६५ रुपयांना विकले आहे. ३४८४ चौरस फुट जागेत २२४८ चौ. फुटाचे बांधकाम सेंट क्लेअर एसटी येथे केले गेले होते. याच प्रकारे १३५४५ फ्लेमिंग एसटी येथील ३०४९ चौ, फुट जागेत बांधलेले ८३२ चौ. फुटाचे घर ७० डॉलर्स म्हणजे ४४५० रुपयात विकले गेले आहे. हे घर बांधण्यासाठी मालकाने ३२५५५ डॉलर्स खर्च केले होते.


९३८४ पेन्टोस्की एव्हेन्यू हे घर काही महिन्यापूर्वी ८४५० रुपयाने विकले गेले होते त्याची किंमत आता अजून कमी झाली आणि ते ६५०० रुपयात विकले गेले. तीन बेडरूमचे हे घर ९७४ चौ. फुटांचे होते आणि त्याचा प्लॉट ३०४९ चौ.फुट आहे. याच किमतीत १४६७८ मॅलरिज एसटी हे घर विकले गेले आहे. तेथे ५६६२ चौ. फुट जागेवर ६७२ चौ. फुट बांधकाम केले गेले आहे. हे घर दोन बेडरूमचे आहे. याच किमतीत ४३९९ पर्कीसन एसटी मधले घर विकले गेले असून ते १५६० चौ.फुटाचे आहे. त्यात ५ खोल्या आहेत. हे घर बांधण्यासाठी मालकाने ४१०४७ डॉलर्स खर्च केले होते.


३०४७ पार्कर एसटी मधले दोन बेडरूमचे एक घर १० हजार रुपयात विकायचे होते पण ग्राहक न मिळाल्याने ते ९७५० रुपयात विकले गेले. हे घर बांधण्यासाठी ३६ हजार डॉलर्स खर्च आला होता. ११०९८ चेल्सी एसटी च्या घर मालकाला त्याच्या घरासाठी ३२५ डॉलर्स किमतीची अपेक्षा होती पण ते त्याला १०० डॉलर्स मध्ये विकावे लागले. दोन बेडरूमचे हे घर ४३५६ चौ. फुट जागेत बांधले गेले आहे.


१२११५ वूडमोंट अव्हेन्यू मध्ये ४३५६ चौ. फुट जागेवर बांधलेले ३ बेडरूमचे घर १३ हजार रुपयात विकले गेले आहे तर ३०४९ डब्ल्यू ग्रांट एसटी मधले ३४ हजार डॉलर्स खर्च करून बांधलेले घरही १३ हजार रुपयात विकावे लागले आहे. ८०३७ स्टॉकटन एसटी मधले ३ बेडरूमचे ३४८४ चौ. फुट जागेत बांधलेले घर ही १३ हजार रुपयात विकले गेले आहे.

Leave a Comment