पंतप्रधान मोदींचे मंत्रीही टेकसॅव्ही


आपण गॅजेटसॅव्ही असल्याची जाहीर कबुली देणारे आणि स्मार्टफोनचा पुरेपूर वापर करणारे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मंत्रीमंडळातील अनेक प्रमुख मंत्री सुद्धा स्मार्टफोनच्या आधुनिक तंत्रद्यानाचा वापर दैनंदिन कामकाजात करत असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातही अॅपल आणि अँड्राईड या सर्वश्रेष्ठ स्मार्टफोनचा वापर करण्याचे प्रमाण सर्वाधिक असून सोशल मिडीयावर हे मंत्रीगण चांगलेच सक्रीय आहेत. पंतप्रधान मोदींनी डिजिटल इंडियाची सुरवात केल्यापासून भारतात स्मार्टफोन वापराचे प्रमाण प्रचंड वाढले आहेच पण केंद्रीय मंत्री त्याचा वापर कुशलतेने करताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदी यांना २०१८ मध्ये चीन दुबईच्या दौऱ्यावर असताना आयफोन सिक्सचा वापर करताना पहिले गेले आहे आणि त्यांनी अनेक सेल्फी पोस्टही केल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव ते अॅपल गॅजेट्सचा वापर करतात असे सांगितले जाते तर गृहमंत्री अमित शहा लेटेस्ट आयफोन एक्सएस चा वापर करतात. शहा दैनंदिन कार्यालयीन काम, पक्ष संपर्क आणि कार्यकर्ते यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी फेसबुक आणि व्हॉटस अपचा वापर मोठ्या प्रमाणावर करतातच पण त्यांच्या ट्विटर अकौंटवर त्यांचे १ कोटी ४० लाख फॉलोअर्स आहेत.


मोदी मंत्रिमंडळातील केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे फोन वापरत असतानाचे फोटो फारसे प्रसिद्ध झाले नसले तरी तेही या आधुनिक तंत्राचा वापर पुरेपूर करतात. फेसबुक, ट्विटरवर गडकरी सक्रीय आहेत आणि त्यांचे नागपूर कार्यालय, तेथील दैनिक कामकाजावर नजर राहावी म्हणून ट्विटर फेसबुक या सोशल साईटचा वापर करतात. त्याचेही सोशल मिडीयावर ५१.५ लाख फॉलोअर्स आहेत. केंद्रीय पेट्रोलीयम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान दोन स्मार्टफोन वापरतात. आयफोन आणि अँड्राईड ओएस फोनचा ते वापर करतात. अपडेट राहणे आणि कार्यालयीन कामकाज सूचना, माहिती घेणे यासाठी ते फेसबुक, व्हॉटस अप, ट्विटरचा वापर करण्यास प्राधान्य देतात. त्यांचेही सोशल मिडीयावर ११ लाख फॉलोअर्स आहेत.


केंद्रीय रक्षा मंत्री निर्मला सीतारमण मोदी यांनी सुरु केलेली कामे आणि त्यांची प्रसिद्धी याबरोबर सरकारी अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवण्यासाठी तसेच जनता संपर्कासाठी फक्त ट्विटरचा वापर करतात. सीतारमण यांचेही सोशल मिडीयावर २२.३ लाख फॉलोअर्स आहेत.

विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांचे सोशल मिडीयावर ११ कोटी फॉलोअर्स असून त्यात ट्विटरचे ४ कोटी ८२ लाख फॉलोअर्स आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सोशल मिडीयावर ९.६ कोटी फॉलोअर्स असून या बाबतील मोदींनी ट्रम्पना मागे टाकले आहे. २०१४ मध्ये जेव्हा मोदी सत्तेवर आले तेव्हा भारतात फक्त दोन कंपन्या स्मार्टफोन चे उत्पादन करत होत्या. २०१९ मध्ये स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांची संख्या २६८ वर गेली असून भारत जगातील दोन नंबरचा मोबाईल उत्पादक देश बनला आहे.

Leave a Comment