चित्रकाराने आत्महत्येसाठी वापरलेल्या पिस्तुलाचा लिलाव


प्रसिद्ध डच चित्रकार विन्सेंट वान गफ याने ज्या पिस्तुलातून स्वतःच्या पोटात गोळी घालून आत्महत्या केली असे समजले जाते त्या पिस्तुलाचा पॅरीस मध्ये नुकताच लिलाव करण्यात आला. या पिस्तुलाला लिलावात सव्वा कोटी रुपये रक्कम मिळाली. कला जगतात हे पिस्तुल सर्वाधिक चर्चेत असलेल्या हत्यारातील एक असल्याने ज्याने हे पिस्तुल खरेदी केले त्याचे नाव लिलावकर्त्यांनी जाहीर केले नाही असे समजते. अर्थात आयोजक गफ ने आत्महत्या केली होती याची खात्री देऊ शकले नाहीत.


मिळालेल्या माहितीनुसार गफ याचा जन्म ३० मार्च १८५३ साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. तो शांत, गंभीर आणि विचारी होता. तरुण वयातच तो आर्ट डीलर म्हणून काम करू लागला. मात्र नंतर तो वेस्टर्न आर्ट क्षेत्रात विख्यात झाला. त्याने २१०० पेंटिंग्ज केली त्यातील ८६० ऑइल पेंटिंग होती. मात्र त्याला यश फार उशिरा मिळाले. त्याच्या सारया सुंदर कलाकृती त्याने आयुष्याच्या शेवटच्या चार वर्षात बनविल्या होत्या. वयाच्या ३७ व्या वर्षी २९ जुलै १८९० मध्ये त्याने पोटात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. त्याचे प्रेत ज्या शेतात होते तेथेच हे पिस्तुल सापडले होते.

वैज्ञानिकाच्या म्हणण्यानुसार १८९० नंतर हे पिस्तुल ७५ वर्षे जमिनीत दबले गेले होते. १९६५ मध्ये ते एका शेतकऱ्याला सापडले आणि त्याने ते हॉटेल मालकाकडे सुपूर्द केले. त्यानंतर ते या हॉटेल मालकाच्या परिवाराच्या ताब्यात होते आणि त्यांनी ते २०१६ मध्ये गफच्या संग्रहालयात ठेवले. असे सांगतात कि गफच्या पोटात जे काडतूस सापडले होते ते या पिस्तुलातून झाडल्या गेलेल्या गोळीशी मॅच होत होती.

Leave a Comment