योगगुरु रामदेवबाबांचे आत्मचरित्र ऑगस्टमध्ये येणार


योग क्षेत्रातील लीडिंग चेहरा आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर योग विद्येला लोकप्रियतेचे नवे परिमाण मिळवून देणारे योगगुरु रामदेवबाबा यांचे आत्मचरित्र ऑगस्टमध्ये प्रकाशित होत आहे. पेंग्विन रँडम हाऊसतर्फे ते प्रकाशित होत असून माय लाईफ माय मिशन असे त्याचे नाव आहे. या पुस्तकासाठी वरिष्ठ पत्रकार उदय माहुरकर यांनी सहलेखन केले आहे. याची माहिती रामदेव बाबा यांनी स्वतःच त्यांच्या ट्विटर वर ही घोषणा केली आहे. त्यावर कॉमेंट करताना ते म्हणतात, आजवर अनेक जननी माझ्याविषयी खूप काही लिहिले आहे आता मी स्वतःच माझ्या आयुष्याची कथा तुमच्यासमोर मांडतो आहे तेव्हा हे पुस्तक प्री ऑर्डर करा.

या पुस्तकात रामदेवबाबांशी जोडले गेलेले प्रमुख वाद, महत्वपूर्ण घटना, त्याना मिळालेले यश, योग, आरोग्य, त्यांचे मित्र, शत्रू अश्या अनेक विषयांना स्पर्श केला गेला आहे. हरियाणाच्या एका छोट्या खेड्यातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंतचा प्रवास समजू शकणार आहे. रामदेव बाबांनी सुरु केलेले स्वदेशी अभियान असेच पतंजली समूहाचा प्रवास त्यातून समजू शकणार आहे.

पत्रकार उदय माहुरकर या संदर्भात म्हणाले, या पुस्तकाचे सहलेखन हा मोठा अनुभव होता. जगभरातील लोकांच्या जीवनावर इतका प्रभाव पाडणारे लोक स्वतंत्र भारतात हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच आहेत.

Leave a Comment