नासावर सायबर हल्ला, २३ फाईल्स मधील माहिती पळविली


अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासावर सायबर हल्ला झाला असून युएस ऑफिस ऑफ द इन्स्पेक्टर जनरल रिपोर्ट नुसार नासाच्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरी सिस्टीम मध्ये डेटा ब्रीच झला असून त्यातून ५०० एमबी डेटा चोरी झाला आहे. हॅकर्सनी २३ फाईल्स मधून माहिती पळविली आहे. हे हॅकर्स कोण आहेत याचा तपास अजून लागलेला नाही.

नासावर सायबर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्यावर्षी ही नासावर असाच हल्ला केला गेला होता व त्यात महत्वाचा डेटा लिक झाला होता. काल झालेल्या सायबर हल्ल्यात रासबेरी पी कम्प्युटर सिस्टीमचा वापर केला गेला असून या संगणकाची किंमत २५ ते ३५ डॉलर्स आहे. हा संगणक क्रेडीट कार्डच्या साईजचा असतो. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात अनेक महत्वपूर्ण मिशन संबंधित डेटाचा अॅक्सेस अॅटॅकर्सना मिळाला त्यात क्युरिओसिटी रोवर या मंगळ ग्रहावर कारप्रमाणे चालणाऱ्या वाहनाशी संबंधित माहिती आहे.


हॅकर्सनी जेपीएल नेटवर्क भेदून नासाच्या डीप स्पेस नेटवर्कचा अॅक्सेस मिळविला. या नेटवर्कचा वापर स्पेस मध्ये कम्युनिकेशनसाठी अँटेना ऑपरेट करण्यासाठी केला जातो. नासा वर सायबर हल्ला झाल्याचे लक्षात येताच जोन्सन स्पेस सेंटरच्या सुरक्षा टीमने प्रभावित नेटवर्क जोडलेली सिस्टीम डिस्कनेक्ट करून सुरक्षा वाढविली आहे असे सांगितले जात आहे.

Leave a Comment