सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ‘गुलाबो सिताबो’मधील बिग बींचा लूक


आगामी ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे झळकणार आहे. नुकताच या चित्रपटातील बिग बींचा लुक रिलीज करण्यात आला आहे. या लुकमध्ये बिग बीं ओळखणे देखील मुश्किल आहे. अमिताभ बच्चन हे या चित्रपटात एका वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारत आहेत. चित्रपटातील त्यांच्या या लूकने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सिताबो’ मधील लूक व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांनी यामध्ये चष्मा घातलेला असून त्यांच्या डोक्यावर दुपट्टा आहे. तसेच यामध्ये त्यांची लांब दाढी दाखवण्यात आली आहे. हा लूक त्यांचा इतर पात्रांच्या तुलनेत अगदीच वेगळा आणि निराळा वाटत आहे. त्यांचे नाकही यामध्ये जरा वेगळे दिसत असल्यामुळे खरंच बिग बी आहेत का असे पहिल्यांदा पाहिल्यावर वाटते.


अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना देखील झळकणार आहे. ‘गुलाबो सिताबो’ यात अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. चित्रपट शूजित सरकार दिग्दर्शित करत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी 24 एप्रिलला रिलीज होणार आहे.

Leave a Comment