स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे डोक्याच्या मागच्या बाजुला येत आहे शिंग


ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट विश्वविद्यालयामध्ये झालेल्या एका संशोधनात दिवसेंदिवस वाढत असलेल्या मोबाइल आणि टॅबलेट्सच्या अतिवापरामुळे आपल्या शरीराची संरचना बदलत असल्याची बाब समोर आली. याबाबत तज्ज्ञांच्या मते, डोक्याच्या मागच्या बाजूला अशा प्रकारच्या गॅझेट्सवर अधिक वेळ घालवल्यामुळे एक अतिरिक्त हाड वाढत असल्यामुळे टेक्स्ट नेक असे नाव याला देण्यात आले असून 2.6 सेमी. पर्यंत याचा आकार आढळला आहे. तसेच, याची खात्री मोबाइल-टॅबलेटचा अधिक वापर करणाऱ्या एक हजार लोकांचे डोके स्कॅन केल्यानंतर करण्यात आली आहे.

याची सत्यता जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांनी 18 ते 86 वर्ष वय असणाऱ्या लोकांचा या संशोधनात समावेश केला होता. 18-30 वयोगटातील लोकांनी टेक्स्ट नेकची समस्या अधिक जाणवते असे या संशोधनात स्पष्ट झाले आहे. तसेच, लहान मुले आणि तरूणांमध्ये पाठीचा कोण बदलणे आणि मानेला त्रास होणे या सारख्या समस्या उद्वभवत आहेत.

यासंदर्भात संशोधक डॉ. डेविड सहर यांच्या मतानुसार, टोकदार हाड मानेमध्ये विकसित होण्याचे प्रकार मागील एका दशकात पाहायला मिळत आहेत. असे काही यापूर्वी नव्हते. मानेद्वारे पाठीकडे येणाऱ्या मांसपेशीचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. त्यासोबतच जवळपास पाच किलो आपल्या डोक्याचे वजन असते आणि या मांसपेशिवर याचा भारसुद्धा पडतो. त्यामुळे हा भार कमी करण्यासाठी मानेच्या मागच्या बाजूस एक नवीन हाड विकसित होत आहे.

त्याचबरोबर डॉ. जेम्स कार्टरनुसार, मुलांच्या पाठीच्या कण्याचा आकार वर्तमान काळात बदलत आहे. त्यासोबतच मोबाइलचा अतिवापर केल्यामुळे त्यांना बॅकपेन, डोकेदुखी, मानेसहित खांद्यामध्ये त्रास होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच, यासारख्या समस्या असणारे अनेक लोक त्यांच्याकडे येतात. पण याचे मुळ कारण टेक्स्ट नेक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment