केतकीच्या हिंदी भाषेबद्दलच्या मताला पाठिंबा नाही


मुंबई – गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री केतकी चितळे चर्चेत आहे. तिला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर हिंदी भाषेत बोलल्याने ट्रोल केले होते. केतकीने अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले होते. नुकतीच तिने याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ‘हिंदी राष्ट्रभाषा आहे, तुम्हाला आलीच पाहिजे’ या केतकीच्या मताशी आम्ही अजिबात सहमत नसल्याचे ट्विट या भेटीनंतर मनसेकडून करण्यात आले. त्याचबरोबर राज ठाकरेंनी घडलेल्या परिस्थितीला धीराने सामोरे गेल्याबद्दल तिचे अभिनंदनदेखील केले.


तिला हिंदी भाषेत बोलल्याने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांकडे तिने निवेदन सादर केले. तिने मुख्यमंत्र्यांच्या कानावर अश्लील भाषेत करण्यात आलेल्या ट्रोलींगचे गांभीर्य घातले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Leave a Comment