अभिजीत बिचुकलेचा जामीन न्यायालयाने नाकारला


सातारा : चेक बाऊन्स प्रकरणी काल सातारा पोलिसांनी बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेला अभिजीत बिचुकलेला अटक केली होती. सातारा जिल्हा न्यायालयाने याप्रकरणी मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने अभिजीत बिचुकलेंचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण त्याचा खंडणी प्रकरणात जामीन नामंजूर केला आहे.

चेक बाऊन्स प्रकरणात काल सातारा पोलिसांनी बिचुकलेला मुंबईतील बिग बॉस मराठीच्या सेटवरुन अटक केली. दरम्यान अभिजीत बिचुकलेंनी न्यायालयात दाखल होण्यापूर्वी प्रसार माध्यमांना या सर्व राजकीय खेळ्या असून यात मला अडकवले जात असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

नक्कीच या प्रकरणात राजकीय हस्तपेक्ष असून वकील संदीप सकपाळचा उपयोग राजकीय स्वार्थसाठी केला जात आहे. साताऱ्यात बिग बॉसच्या कार्यक्रमात जाण्यापूर्वी किंवा आता माझी चांगली प्रतिष्ठा आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मी अर्ज करणार असल्यामुळे संदीप सकपाळला अमिष दाखवून माझ्याविरोधात भडकवले जात आहे. न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास असून लवकरच या प्रकरणाचा निकाल लागेल अशी मला खात्री असल्याचे त्याने म्हटले आहे.

Leave a Comment