‘खानदानी शफाखाना’चे दुसरे पोस्टर रिलीज


लवकरच ‘खानदानी शफाखाना’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले होते. त्याचबरोबर चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीखही जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता नुकतेच चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.


सोनाक्षी सिन्हा, वरूण शर्मा आणि गायक बादशाह यांची झलक या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. कोमल नाहटा यांनी हे पोस्टर अब शट अप नहीं, होगा शटर अप, असे कॅप्शन देत शेअर केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिल्पी दासगुप्ता यांनी केले आहे. तर याची निर्मिती भूषण कुमार, महावीर जैन आणि म्रीघदीप सिंग लंबा यांनी केली आहे. हा चित्रपट २६ जुलैला रिलीज होणार आहे.

Leave a Comment