कंगनाच्या सहकलाकारचे संजय दत्तच्या ‘बाबा’मधून मराठीत पदार्पण


लवकरच मराठी सिनेसृष्टीत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पदार्पण करणार असून तो ‘बाबा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. संजय दत्तने नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते. वडील आणि मुलाची झलक ज्यात प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

पोस्टर शेअर करताना संजय दत्तने चित्रपटात झळकणाऱ्या कलाकारांबाबत माहिती दिली नव्हती. आता त्यावरुन पडदा हटवण्यात आला आहे. या चित्रपटात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रशिक्षण घेतलेला आणि ‘तनू वेडस मनू’मध्ये भूमिका बजावलेला दीपक दोब्रियाल हा मुख्य भूमिकेत असेल. हा त्याचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात नंदिता धुरी पाटकरसुद्धा प्रमुख भूमिकेत आहे. त्याचबरोबर स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि लोकप्रिय बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राज आर गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी यापूर्वी माधुरी दीक्षितच्या ‘बकेट लिस्ट’या चित्रपटाचे सह-दिग्दर्शन केले होते.

Leave a Comment