दीपिकाच्या या ब्लेझरची किंमत ऐकूण तुम्हाला नक्कीच चक्कर येईल


बॉलीवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण ही हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे हे आपल्याला काही नव्याने सांगायची गरज नाही. ती आपल्या हटके स्टाईलमुळे देखील ओळखली जाते. आगामी ’83’ या चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनांमुळे सध्या ती चर्चेत आहे.


या मानधनासोबतच ती तिच्या फॅशनला घेऊन सुद्धा तितकीच चर्चेत असते. ती न्यूयॉर्कमध्ये नुकतीच एका कार्यक्रमासाठी गेली होती. या कार्यक्रमाचे काही फोटो आणि व्हिडिओ दीपिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या कार्यक्रमामध्ये ती ब्लॅक ब्लेझर आणि बाइड लेग्ड पॅन्टमध्ये दिसली. दीपिकाने यासोबतच पॉइंटेड टो हिल्स आणि गोल्ड ईअररिंग्स सुद्धा घातले होते. दीपिका या लूकमध्ये खुपच सुंदर दिसत होती.


आता तिचा हा लूक एका वेगळ्या कारणामुळेच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमादरम्यान दीपिकाने घातलेल्या Alberta Ferretti फ्रिंज ब्लेझरची किंमत ऐकून तुम्हाला चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. तब्बल १,७४५ अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास १ लाख २१ हजार रूपये एवढी दीपिकाने घातलेल्या ब्लेझरची किंमत आहे.


दीपिकाने नुकतेच आपल्या आगामी छपाक चित्रपटाचे चित्रिकरण शूटिंग पूर्ण केले आहे. छपाक चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या संघर्षाची आणि खडतर प्रवासाची कथा या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. यात दीपिका पादुकोण लक्ष्मीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Comment