निवृत्तीनंतरही ‘या’ संघाकडून क्रिकेटच्या मैदानात उतरणार सिक्सर किंग


नवी दिल्ली – नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ‘सिक्सर किंग’ युवराज सिंह याने निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो आता आपल्या इनिंगची सुरुवात करणार आहे. कॅनडातील ग्लोबल टी -२० लीग (जी -२०) स्पर्धेत खेळताना तो दिसणार आहे. टोरांटो नॅशनल टीमने गुरुवारी पार पडलेल्या जी २० च्या दुसऱ्या लिलावात युवराजला विकत घेतले.

काही दिवसांपूर्वी कॅनडातील ग्लोबल जी टी -२० मध्ये खेळण्यासाठी युवराजने बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती, त्याला बीसीसीआयने मंजुरी दिल्यामुळे या लीगमध्ये खेळताना तो दिसणार आहे. या स्पर्धेत खेळणारा युवराज एकमेव भारतीय खेळाडू असणार आहे.

युवराजला किती रकमेला टोरांटो नॅशनल टीमने विकत घेतले याची माहिती समोर आली नाही. पण युवराज सोबतच या लीगमध्ये अनेक देशांचे नामवंत खेळाडू खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि वेस्टइंडिजच्या ख्रिस गेलसह इतर अनेक दिग्गज खेळाडूंचा यात समावेश आहे. याव्यक्तिरिक्त पाकिस्तानी खेळाडूही या लीगमध्ये खेळताना दिसतील.

Loading RSS Feed

Leave a Comment