टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांपासून बनवली १५०० फूट लांब भिंत


प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे होत असलेले नुकसान माहित असताना देखील आजकाल प्लास्टिकचा वापर सर्रास होत असल्याचे दिसते. कित्येक देशांनी याबाबत कठोर पावले देखील उचलली आहेत तरी देखील प्लास्टिकवर पूर्णतः बंदी आणण्यात म्हणावे तसे यश आलेले नाही. काही देशांनी तर प्लास्टिक बंद करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न केले जावे असे देखील म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील मसूरीमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जागरूकता करण्यासाठी एक चांगली संकल्पना समोर आणली गेली आहे.


१५ हजार प्लास्टिकच्या बेकार बाटल्यांपासून मसूरीच्या बंग्लोतील कांडी गावात एक रंगीत भिंत तयार केली गेली आहे. ‘वॉल ऑफ होप’ म्हणजेच आशेची भिंत असे या भिंतीचे नामकरण करण्यात आले आहे. ही भिंत १५०० फूट लांब आणि १२ फूट उंच आहे. सुबोध केरकरने या भिंतीचं डिझाइन तयार केले आहे.

याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, आम्ही गाव, शहरांना प्लास्टिक मुक्त करण्यासाठी काम करत आहोत. ही भिंत तयार करून आम्हाला जनतेला संदेश द्यायचा आहे की, प्लास्टिकचा वापर कमी करा. स्थानिक लोकांना त्यांनी हेही सांगितले की, प्लास्टिक खासकरून डोंगरांसाठी नुकसानकारक आहे. नुकताच भिंतीसमोर एक संगीत कार्यक्रमही सादर करण्यात आला. सितारवादक अग्नि वर्मा या व्हिडीओमध्ये सितार वादन करत आहेत.

Leave a Comment