सौदर्यवती खासदार नुसरत जहाँ विवाहबद्ध


प. बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून तृणमूल कॉंग्रेसच्या तिकिटावर साडेतीन लाख मतांनी निवडणूक जिंकून खासदार बनलेली प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहाँ खासदारांच्या शपथविधीवेळी शपथ न घेऊ शकल्याचे कारण समोर आले आहे. ही बंगाली अभिनेत्री त्यावेळी तुर्कस्तानात कोलकाता येथील उद्योजक निखील जैन यांचा हात धरून सात फेरे घेत होती. नुसरत हिने या संदर्भात ट्विटरवर लग्नाचे फोटो शेअर करून लग्नाची बातमी दिली आहे. हे लग्न हिंदू रीतीरिवाजानुसार अगदी जवळच्या आप्तांच्या उपस्थितीत साजरे झाले, तुर्कस्तानांतील बोडरम शहरात हा विवाह पार पडला.


२९ वर्षीय नुसरतने गुरुवारी सोशल मिडीयावर तिच्या विवाहाचे फोटो शेअर केले आहेत. या समारंभाला तिची जिवलग मैत्रीण व तृणमूलची खासदार मिमी चक्रवर्ती उपस्थित होती त्यामुळे तीही खासदारशपथ विधीच्या वेळी गैरहजर होती असे समजते. या दोघी तरुण खासदार जेव्हा सर्वप्रथम संसदेत गेल्या तेव्हा त्यांच्या कपड्यावरून त्यांना सोशल मिडिया मध्ये ट्रोल केले गेले होते कारण नुसरत तेव्हा जीन्स मध्ये संसदेत आली होती.


नुसरतचे जीवनसाथी निखील जैन कोलकाता येथील प्रसिद्ध उद्योजक असून त्यांचा टेक्स्टाईलचा उद्योग आहे. हे दोघे लग्नाचे रिसेप्शन ४ जुलै रोजी देणार आहेत. त्यावेळी राजकारण आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांना आमंत्रण केले गेले आहे. नुसरत, निखील जैन यांच्या टेक्स्टाईल चेन रंगोलीची ब्रांड अम्बेसिडर होती.

Leave a Comment