शाओमी फ्लिप कॅमेरयासह नवा स्मार्टफोन आणणार


चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमीने फ्लिप कॅमेरा असलेला नवा स्मार्टफोन बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र हा नवा फोन मी किंवा शाओमी या ब्रांडखाली येणार नाही तर शाओमीने गेल्या वर्षी भागीदारी करार केलेल्या मेझू ब्रांडखाली सादर केला जाणार आहे असे समजते. नव्या भागीदारीतला हा पहिला स्मार्टफोन असेल.

चीन मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट बेईबोवर मेझूच्या नव्या स्मार्टफोनचे पोस्टर जारी केले गेले असून त्यात रिअरला ट्रिपल कॅमेरा सेट एलइडी फ्लॅश सह दिसत आहे. चौकोनी आकाराचा हा कॅमेरा सेटअप आकाराने थोडा मोठा दिसतो आहे. हा फोन गोल्डपिंक ग्रेडीयंट डिझाईन मध्ये असेल आणि त्याचा प्रायमरी कॅमेरा ४८ एमपी सेन्सरचा असेल असे समजते. हा हँडसेट शाओमी मेझूच्या नव्या लिटल फेअरी नावाने ओळखला जाणार आहे. यावरून हा स्मार्टफोन जगभरातील महिला वर्गाला फोकस करण्यासाठी बनविला जाईल असे संकेत मिळत आहेत. हा फोन पॉवरफुल असेल तसेच देखणा दिसेल असा दावा केला जात आहे.

या फोनसोबत एआय बेस्ड ब्युटी इनहँन्समेंट फीचर्स दिली जातील. सध्या पॉप अप कॅमेरा ट्रेंड स्मार्टफोन क्षेत्रात दिसत असला तरी त्यापुढचा ट्रेंड फ्लिप कॅमेरा असेल असे सांगितले जात आहे. तैवानच्या स्मार्टफोन उत्पादक आसुसने भारतीय बाजारात नुकताच फ्लिप कॅमेरा फोन आसुस ६ झेड लाँच केला असून तो तीन व्हेरीयंट मध्ये सादर केला गेला आहे. त्याची सुरवातीची किंमत ३१९९९ रुपयापासून आहे. तो ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज सह आहे.

Leave a Comment